सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना व जिल्हा व्यापारी संघ संलग्न सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेची तातडीची सभा शनिवार २ डिसेंबरला सकाळी ११ वाजता सावंतवाडी नगरपालिकेच्या पत्रकार कक्षाशेजारील सभागृह क्र. ७, पहिला मजला येथे आयोजित करण्यात आली आहे. महावितरण कंपनीकडून पुरविण्यात येणाऱ्या वीज सेवांमधील समस्यामुळे ग्राहकांमध्ये वारंवार आक्रोश होत आहे. तसेच महावितरणकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवांमधील त्रुटींवर चर्चा करणे तसेच डिसेंबर २०२३ मध्ये सावंतवाडीत वीज ग्राहक मेळावा घेण्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सर्व तालुका कार्यकारिणी, तालुक्यातील जिल्हा कार्यकारिणी सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका संघटना सचिव व अध्यक्षांकडून करण्यात आलें आहे.





