जि. प. च्या 4 नंबर शाळेला युनिसेफच्या मैथिली गुप्तेंची भेट…!

सावंतवाडी : स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त, ISO मानांकित जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर 4 ला नुकतीच युनिसेफ महाराष्ट्रच्या मैथिली गुप्ते मॅडम यांनी सदिच्छा भेट दिली. सोबत समग्र शिक्षा अभियान सिंधुदुर्ग च्या APO मान.श्रीम.स्मिता नलावडे मॅडम , केंद्र प्रमुख श्रीम.स्नेहा लंगवे मॅडम , समग्र शिक्षा सावंतवाडी चे पिंगुळकर सर आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संतोष तळवणेकर उपस्थित होते.

यावेळी मैथिली मॅडमनी इयत्ता पाचवी, सहावी व सातवी च्या विद्यार्थ्यांशी हितगुज केली. विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप सुंदर प्रकारे प्रतिसाद दिला.मॅडमनी श्री.केशव जाधव यांजकडून शाळेच्या विविध उपक्रमांची विस्तृत माहिती करून घेतली . शाळेचा अद्ययावत संगणक कक्ष, सुंदर प्रयोगशाळा, भव्य प्रवेशद्वार आणि सुंदर परिसर न्याहाळताना मॅडम खूप प्रसन्न होऊन गेल्यात. शाळेच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता, स्वच्छ व सुंदर शाळा आणि उपक्रमशील शिक्षकांची मेहनत पाहून मैथिली मॅडमनी आनंद व्यक्त केला आणि जिल्ह्यातील एक सर्वसोयींनी युक्त अशी आदर्श शाळा पहायला मिळाली असे गौरवोद्गारही काढले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री पावरा सर, श्रीमती कविता धुरी मॅडम, श्रीमती प्रणिती सावंत मॅडम, श्री.अमर पाटील सर, सुजाता पवार मॅडम आणि कामगिरी शिक्षिका श्रीम.बागवे मॅडम उपस्थित होत्या. शेवटी केशव जाधव सरांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.