कोपरगावच्या गौरीने सारेगमप लिटील चॅम्पस्च्या विजेतेपदावर कोरलं नाव.!

52

मुंबई : झी मराठी सा रे ग म प लिटील चॅम्पस्चं नवीन पर्व सध्या सुरू आहे. या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात गौरी पगारे सा रे ग म प लिटिल चॅम्पस पर्वाची महविजेती झालीय. गौरीने सा रे ग म प लिटिल चॅम्पस विजेतेपद देण्यात आलंय. सुरेश वाडकर, सलील कुलकर्णी अशा मान्यवरांच्या उपस्थितीत गौरीला विजेती म्हणून घोषित करण्यात आलं. गौरी मूळची कोपरगावची असून अत्यंत खडतर परिस्थितीतून लहान वयातच तिने गायिका होण्याचं स्वप्न पाहिलं. अखेर आज गौरीने सा रे ग म प लिटिल चॅम्पसच्या विजेतेपदावर स्वतःचं नाव कोरल आहे. गौरीची शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी आहे. गौरी सा रे ग म प लिटिल चॅम्पस महाअंतिम सोहळ्याची विजेती झाल्याने महाराष्ट्रातील तमाम जनता तिचं अभिनंदन करत आहे.