कुणकेश्वर हायस्कूल येथे करिअर मार्गदर्शन उपक्रम संपन्न.! ; विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजन.

27

देवगड : तालुक्यातील कुणकेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी कुणकेश्वर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कुणकेश्वर हायस्कूलमध्ये करिअर मार्गदर्शन उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यात इयत्ता सातवी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी व पालकांकरिता शनिवारी सकाळी साडेआठ ते बारा या वेळेत पार पडला. यावेळी सुमारे 200 विद्यार्थी व बालक उपस्थित होते. या कार्यक्रमात खानविलकर कोचिंग अकॅडेमी फोंडा कणकवलीचे मार्गदर्शक प्रदीप खानविलकर यांनी उपयुक्त मार्गदर्शन करून सहकारी क्षेत्रातील ग्रामीण भागातील संस्थेमार्फत असे उपक्रम राबविले जातात ही बाब अभिमानास्पद, कौतुकास्पद असल्याचे आवर्जून सांगितले.


याप्रसंगी कुणकेश्वर सोसायटीचे चेअरमन निलेश पेडणेकर, व्हाईस चेअरमन भाऊ मुंबरकर, अमृत महोत्सव समिती अध्यक्ष तुकाराम तेली, कुणकेश्वर शिक्षण विकास मंडळ अध्यक्ष चंद्रकांत घाडी, मुख्याध्यापक श्री यादव, सोसायटी संचालक नागेश आचरेकर, शंकर नाणेरकर, संदीप जोईल, शांताराम चव्हाण ,सत्यवान धुरी, अन्य पालक उपस्थित होते.