सावंतवाडी: उद्या रविवार, दिनांक 26 नोव्हेंबर रोजी ‘संविधान दिनानिमित्त’ सावंतवाडी येथे भारतीय बौद्ध महासभा सावंतवाडी – दोडामार्ग आणि वंचित बहुजन आघाडी सावंतवाडी शहर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारताचे संविधान हाच आमचा अभिमान’ या टॅग लाईनखाली भव्य संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता सदर रॅलीस सुरुवात होणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर, सावंतवाडी ते गांधी चौक असा रॅलीचा मार्ग असून रॅलीचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, सावंतवाडी येथे करण्यात येणार आहे.
या संविधान रॅलीच्या निमित्ताने कार्यक्रमाचे उद्घाटक सत्यवान जाधव, स्वागताध्यक्ष मानसी सांगेलकर, कांचन असणकर असून प्रमुख मार्गदर्शक बुद्धभूषण हेवाळकर, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दोडामार्ग व कौडीन्य पवार, वंचित बहुजन आघाडी मालवण तालुका सचिव हे असणार आहेत. यावेळी भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग विश्वनाथ कदम, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग महेश परुळेकर, भारतीय बौद्ध महासभा सावंतवाडी तालुकाध्यक्ष बुधाजी कांबळे, भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष दोडामार्ग अर्जुन कदम, वंचित बहुजन आघाडी सावंतवाडी तालुकाध्यक्ष विजय शेर्लेकर, वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष नवसो कदम, भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष मधु कदम, भारतीय बौद्ध महासभा सावंतवाडी तालुक्याचे आर. जी. चौकेकर, भीम गर्जना बौद्ध मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष मंगेश कदम, भारतीय बौद्ध महासभा कोषाध्यक्ष ॲड. एस. के. चेंदवणकर, संरक्षण विभाग भारतीय बौद्ध महासभा अशोक कदम, कुडाळ वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष अंकुश जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून ज्येष्ठ उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नारायण पांचाळ, सावंतवाडी तालुका वंचित बहुजन आघाडीचे मोहन जाधव, कणकवली वंचित बहुजन आघाडीचे संजय तांबे, भिवा आयनोडकर, विकास जाधव, श्रीधर जाधव, विनोद कदम, मधुकर कदम, मिलिंद नेमळेकर, सुनील जाधव, काशीराम असणकर, राजन जाधव, रमाकांत जाधव, संतोष हेवाळकर, प्रदीप कांबळे, आनंद जाधव, विलास कदम आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी तसेच समता सैनिक दल सावंतवाडी दोडामार्ग यांच्या वतीने भव्य सन्मान रॅली यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





