किल्ले सजावट स्पर्धेत सुधीर चव्हाण अव्वल! ; इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीतर्फे आयोजन.

98
  • सावंतवाडी : इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीतर्फे किल्ले सजावट स्पर्धा घेऊन मुलांमध्ये ऐतिहासिक आवड, एकाग्रता,चिकाटी आणि संघटन कौशल्य निर्माण होण्यासाठी किल्ले सजावट स्पर्धा घेण्यात आल्याचे अध्यक्ष रिया रेडीज यांनी सांगितले.
  • सदर किल्ला सजावट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सुधीर गुरुराज चव्हाण, द्वितीय क्रमांक पार्थ मिशाळ, तृतीय क्रमांक सोहन विजय सावंतआणि उत्तेजनार्थ बक्षीस हर्षवर्धन निर्गुण आणि प्रभात देसाई यांना मिळाली.स्पर्धा परीक्षक म्हणून सौ. सुमेधा नाईक, रोमीत रेडीज आणि सोहम तेंडुलकर यांनी केले.