तामिळनाडू, पुद्दुचेरीमध्ये अवकाळी पावसाचा कहर.! ; शाळांना सुट्टी देण्याची वेळ, केरळमध्येही कोसळधारा.!

103

चेन्नई : तामिळनाडूमध्ये तुफान पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक जिल्ह्यात तुफान पाऊस बरसत आहेत. या पावसामुळे तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यात सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तिरुनेलवेली, कन्याकुमारी, थूथुकुडी, तेनकासी, विरुधुनगर, पुधुकोट्टई, नीलगिरी या जिल्ह्यांना पावसाचा मोठा फटका बसला. ऐन हिवाळ्यात तुफान पाऊस बरसत असल्यामुळे तामिळनाडूतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. याआधीच हवामान विभागाने केरळ, तामिळनाडूच्या बहुसंख्य भागात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार कालपासूनच तामिळनाडू, केरळमध्येही पाऊस बरसत आहे.