दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या १५ जणांची उपसरपंचपदी निवड झाली असल्याचा दावा तालुकाप्रमुख संजय गवस यांनी केला आहे. यामध्ये संतोष मोर्ये – मोर्ले, विजय दळवी – घोटगे, श्याम नाईक – झरेबांबर, सागर कर्पे – घोडगेवाडी, कृष्णा गवस – मांगेली, पांडुरंग राणे- कोलझर, बळीराम नाईक- उसप, नमित नाईक – तळेखोल, मोहन गवस- आंबडगाव तसेच आयी, मणेरी, सासोली, कोनाळ, बोडदे-खानयाळे, विर्डी ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना शिवसेना ग्रामपंचायत सदस्यांनी मदत केली असून विजयी झालेले उपसरपंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे असल्याचे मत शिवसेना तालुका प्रमुख संजय गवस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.





