मुंबई : दिनांक १८ नोव्हेंबर रोजी विक्रमगड वसुरी माळे येथे ३२५ आदिवासी भगिनींना पारंपारीक पद्धतीने ओवाळणी करून साडी-चोळी देऊन भाऊबीज साजरी करण्यात आली. तसेच मोखाडा देवबांध येथील सहयाद्री बहुविविध आदिवासी सेवा संस्था या संस्थेला 200 साड्या भाऊबीज उपक्रमासाठी देण्यात आल्या. कोकण कट्टा विलेपार्ले यांच्या कडून अनेक स्तुत्य सामाजिक उपक्रम रावबिले जातात त्यातील हा एक उपक्रम असल्याचे अजित पितळे यांनी सांगितले.
कोकण कट्टाच्या संस्थापक अध्यक्ष अजित पितळे, जगन्नाथ गावडे, सुजित कदम, विवेक वैद्य, सुनील वनकुंद्रे, जयवंत जोशी, संतोष जाधव, विलास सावंत, विनोद आचरेकर, प्रथमेश पवार यांच्यासमवेत उपस्थित होते. या उपक्रमासाठी श्री स्वामी समर्थ मठ विलेपार्ले यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच मुंबईचा पेशवा – विलेपार्ले, वीर हनुमान सोसायटी इमारत क्रमांक २ – अंधेरी, आधार स्तंभ – जोगेश्वरी, महालक्ष्मी मंदिर – विलेपार्ले, साई श्रद्धा मित्र मंडळ – अंधेरी, राम मित्र मंडळ – अंधेरी यांच्यासह समस्त विलेपार्लेकरांनी कोकण कट्ट्याला सहकार्य केल्याबद्दल कोकण कट्ट्याचे सचिव सुनील वनकुंद्रे यांनी आभार व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन प्रसाद वालावलकर यांनी केले. विक्रमगड येथे श्री स्वामी समर्थ मठ उभारण्याचे मंगल कार्य त्यांनी सर्वांच्या सहकार्याने सुरू केले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ नामाचा जप करण्यात आला. तेथील जवळच असलेल्या आदिवासी वाड्यांवरील तीनशे आदिवासी भगिनी कार्यक्रमाला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वालावलकर कुटुंब, कोकण कट्टा चे सहकारी आणि स्थानिक रहिवाश्यांनी मेहनत घेतली.






