Big News – सावंतवाडीच्या मोती तलावात महिलेची उडी, पोलिसांचा फौज फाटा दाखल.!

179

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील राजवाडा गेटसमोर मोती तलावाच्या काठावर बसलेली महिला तलावात पडून बुडाल्याची घटना रात्री उशिरा घडली. याच वेळी या ठिकणी उपस्थित असलेल्या दानिश राजगुरू नामक युवकाने तलावात उडी घेत तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो यशस्वी होऊ शकला नाही. सदर महिला ३० ते ३५ वयोगटातील असल्याची माहिती उपस्थितांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे, पोलीस हवालदार आबा पिळणकर, अनिल धुरी, प्रवीण वालावलकर आदी घटनास्थळी दाखल झाले असून सदर महिलेला वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यावेळी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.