कुडाळ पंचायत समिती लई भारी.!, राज्यस्तरावर सर्वोत्कृष्ट प्रथम क्रमांक अन् मानाचे तिहेरी मुकुट.! ; राज्य शासनाच्या महाआवास अभियान 2021- 22 चा निकाल जाहीर.

113

कुडाळ : राज्य शासनाच्या महाआवास अभियान 2021- 22 चा निकाल आज जाहीर झाला असून कुडाळ पंचायत समितीने या योजनेत राज्यस्तरावर सर्वोत्कृष्ट प्रथम क्रमांक मिळवित मानाचे तिहेरी मुकुट प्राप्त केले आहेत. गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या कारकिर्दीत केलेल्या देदीप्यमान कामगिरीसाठी या पुरस्कारानी या योजनेत दुसऱ्यांदा सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. 23 नोव्हेंबरला या पुरस्काराचे वितरण मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
राज्यात महाआवास – 4 सन 2023/24 च्या अभियानाचा शुभारंभ  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शुभहस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस अजित पवार  ग्रामविकास व पंचायतराज तसेच इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार 23 नोव्हेंबर 2823 रोजी दुपारी 3 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर ऑडिटोरीयम, जगन्नाथ भोसले मार्ग, नरिमन पॉईट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमात ‘महा आवास अभियान- 2021-22 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संस्था, व्यक्ती यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे, असे संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांचे कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे

दरम्यान, महाआवास अभियान 21- 22 मध्ये पंतप्रधान आवास योजना व राज्यस्तरीय पुरस्कृत रमाई आवास योजनेमध्ये कुडाळ पंचायत समितीने तिहेरी यश मिळविले आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेत राज्स्तरावर सर्वोत्कृष्ट ठरत प्रथम क्रमांक मिळविला आहे तर राज्य पुरस्कृत रमाई आवास योजनेत राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. महा आवासचे काम पाहणारी डाटा ऑपरेटर म्हणून सानिका सदानंद चव्हाण यांना सर्वोत्तम डाटा ऑपरेटर म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. हा मानाचा तिहेरी मुकुट कुडाळ पंचायत समितीने प्राप्त केला आहे. राज्यात महाआवास योजना 20- 21 मध्ये सुरू झाली
त्यावेळी सुद्धा कुडाळ पंचायत समितीने गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी व त्यांच्या टीमने देदिप्यमान यश मिळविले होते. यामध्ये कुडाळ पंचायत समिती कोंकण विभागास्तरावर विजेती ठरली होती, तर कुडाळ तालुक्यातील रमाई आवासमध्ये अणाव व प्रधानमंत्री आवासमध्ये वाडोस ग्रामपंचायतीनी राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता. तसेच सर्वोत्कृष्ट ग्रामीण गृह निर्माण अभियंता म्हणून स्नेहा नागदे यांची निवड झाली होती. शासन दरबारी हा मिळालेला हा पुरस्कार त्याच्यासाठी गौरवास्पद आहे. राज्यसरकारचे हे महाआवास योजनेचे दुसरे वर्ष असून सलग दुसऱ्या वर्षीही  पुरस्कार मिळविण्यात कुडाळ पंचायत समितीने यशाचे सातत्य या निमित्ताने टिकवून ठेवले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ तालुक्यात कुडाळ तालुका पंचायत समिती राज्य शासन पुरस्कारासाठी नेहमीच अग्रेसर होती. गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या साडेसहा वर्षाच्या कालावधीत त्यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे सातत्याने ही पंचायत समिती केवळ कोकणातच नव्हे तर राज्यपातळीवर नेहमीच अव्वल राहिली. श्री विजय चव्हाण आणि त्यांच्या टीमने या योजनेच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यात अनेक उपक्रम राबवले. श्री चव्हाण यांनी सातत्य ठेवल्यामुळे 31 ऑक्टोबरला ते सेवानिवृत्त झाले तरी त्यांच्या कारकीर्दीत महा आवासमध्ये हा सलग दुसऱ्यांदा कुडाळ पंचायत समितीला प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यस्तरावर प्रथम आणि राज्यशासनाच्या महा आवास योजनेत द्वितीय ठरली आहे, हे विशेष म्हणावे लागेल.
पंचायत समितीने मिळविलेल्या देदिप्यमान यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी तसेंच सर्व स्तरातून विजय चव्हाण यांचे व त्याच्या टीमचे विशेष अभिनंदन केले आहे.