देवगड युथ फोरम आयोजित रांगोळी स्पर्धेत समीर चांदरकर प्रथम..!

192

देवगड : युथ फोरम देवगडच्या माध्यमातून सलग तिसऱ्या वर्षी पोर्टेट रांगोळी स्पर्धा व प्रदर्शनाचे गुरुवार दि 16 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर 2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उदघाटन उद्योजक श्री अनिल कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत सर्व स्पर्धकांनी आपल्या कलाविष्काराने उत्कृष्ट कलाकृती सलग चोवीस तास बसून साकारली. या स्पर्धेमध्ये राज्यातील अनेक नामवंत स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.या प्रदर्शनाचे उदघाटन देवगड नागरी पतसंस्था अध्यक्ष श्री अविनाश माणगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी श्री. एल. डी. बिले. रजिस्टर इंस्पेकशन ( मुंबई हाय कोर्ट), दयानंद पाटील अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा देवगड शहर, सौ. शीतल कदम संचालिका सेलिब्रेशन कॅफे, श्री. मधुकर नलावडे, ज्येष्ठ कलावंत आणि रूचिदा मसालेचे संचालक. युथ फोरम देवगड उपाध्यक्ष श्री. प्रणव नलावडे. सचिव श्री. अमित पारकर. तसेच संस्थेचे मोलाचे मार्गदर्शक श्री. मृत्युन्जय मुणगेकर आदी उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षक श्री. विरेश वाणी. व श्री. प्रवीण धांदरुत यांनी केले.

हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले करण्यात आले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संस्थेचे अध्यक्ष श्री. सिद्धेश माणगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली व देवगड जामसंडे नगरपंचायत नगरसेवक श्री संतोष तारी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडला.

या स्पर्धेमध्ये सलग तिसऱ्या वर्षी समीर चांदरकर (ता मालवण) यांनी प्रथम क्रमांक श्री. काशिनाथ चारी(रा. गोवा) यांनी द्वितीय क्रमांक तर तन्मेष परब(रा.गोवा) यांनी तृतीय क्रमांक संपादन केला.तर यावर्षी प्रथमचं उत्तेजनार्थ तीन क्रमांक काढण्यात आले यामध्ये उत्तेजनार्थ प्रथम श्री. केदार टेमकर (ता. कुडाळ), द्वितीय क्रमांक प्रशांत सुवर्णा (रा. मुंबई), व तृतीय क्रमांक साईनाथ पारकर (ता. मालवण) यांनी प्राप्त केले आहेत. यावेळी उपस्थित सर्व मान्यवारांनी आपले मनोगत व्यक्त केले व संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋत्विक धुरी यांनी केले. सदर प्रदर्शन रविवार पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत खुले असून देवगड मधील सर्व कलारासिकांनी

उत्कृष्ट अश्या कलाकृतीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन युथ फोरम देवगडच्या वतीने करण्यात आले आहे