मुंबई : साऊथ सुपरस्टार प्रभास हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. काही दिवसांपुर्वी त्याच्या सोशल मिडियावर अकाउंटसोबत छेडछाड करण्यात आली होती. त्यानंतर प्रभासच्या टिमने हे सर्व प्रकरण हाताळले. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आता त्याच्या चाहत्यांना प्रभासच्या आगामी ‘सालार: पार्ट सीझफायर’ या चित्रपटाची उत्सुकता आहे.
प्रभास ‘सालार’च्या रिलिजसाठी सज्ज झाला असताना दुसरीकडे प्रभास परदेशात गेला होता. आदिपुरुष फ्लॉप झाल्यानंतर प्रभास कॅमेऱ्यापासून लांबच राहिला. या सगळ्यात प्रभास बऱ्याच दिवसांपासून गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त होता. सततच्या शुटिंगमुळे त्याची दुखापत आणखीनच वाढली होती. त्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. त्यामुळे गुडघ्याच्या उपचारासाठी प्रभास युरोपला गेला होता. तिथे प्रभासवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आता गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतर प्रभास अखेर भारतात परतला आहे.
सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. विमानतळावरुन परत येत असताना पापाराझींनीही त्याला स्पॉट केलं. यावेळी प्रभास काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसला. त्याने चष्मा आणि मास्क लावून चेहरा लपवला होता.
प्रभासचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर दुसराकडे तो भारतात परतल्याने त्याचे चाहते खुप आनंदी झाले आहे. आता प्रभास त्याच्या सालार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होणार आहे.





