मुंबई : शनिवार दिनांक 28 ऑक्टोबर 2023 रोजी बालभारती मुंबई येथे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण संचालक शरद गोसावी साहेब आणि उपसचिव तुषार महाजन यांच्यासोबत राज्यातील सर्व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक झाली.
शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांची अशैक्षणिक कामे रद्द करा, या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करताना शिक्षण सचिव यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्या कमिटीची बैठक शिक्षक प्रतिनिधी सोबत आयोजित करण्यात आली आहे.
दरम्यान, शिक्षक आपल्या माध्यमातून आपणास शाळा स्तरावर कोणकोणती अशैक्षणिक कामे करावी लागतात? याची लेखी माहिती वरिष्ठांनी मागितली आहे .
शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी निवडणुका, जनगणना आणि आपत्ती या व्यतिरिक्त अन्य कोणताही कामे शिक्षकांना देण्यात येऊ नये, याविषयावर ठाम भूमिका मांडली आहे. जेणेकरून वरिष्ठांना सादर करणे सोईचे जाणार आहे, असे आवाहन म .ल. देसाई, राज्य संयुक्त चिटणिस, अखिल महाराष्ट प्राथमिक शिक्षक सं, सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे.





