विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांचा सायन्स ऑलिम्पियाड स्पर्धेत डंका.!

47

कणकवली : विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील सायन्स विभागातील विद्यार्थ्यांनी शिरगाव येथे पार पडलेल्या सायन्स ऑलिम्पियाड स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून यशस्वी झाले. या स्पर्धेत विविध शाळेतील एकूण ९० विद्यार्थी सहभागी झाले होते. ‘अणू आणि अणूंची संरचना’ या विषयाचा अभ्यास स्पर्धेत समाविष्ठ होता. विद्यामंदिर प्रशालेच्या सहभागी स्पर्धकांनी आपल्या बुद्धीचे कौशल्यपणाला लावून स्पर्धेत पैकीच्या पैकी गुण प्राप्त करून यश संपादन केले आणि विद्यामंदिर प्रशालेच्या यशाच्या शिखरात मानाचा तुरा खोवला. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे विज्ञान शिक्षक श्री. पृथ्वीराज बर्डे,  सौ. केळुसकर मॅडम, श्री. दिनेश मोर्ये सर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पी. जे. कांबळे, पर्यवेक्षिका सौ. जाधव मॅडम तसेच सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.