पुणे : भारताने पुणे येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यात एकतर्फी विजय संपादन केला. या सामन्यात किंग कोहलीने धमाकेदार विराट शतक साजरे करताना बांगलादेशचा अक्षरशः एकतर्फी धुव्वावा उडवला. या सामन्यात भारताने सात गडी राखून विजय संपादन केला आहे. सलामीवीर शुभमन गीलने देखील अर्धशतक झळकावले.




