सायबर सुरक्षा मोहिमेंतर्गत कलंबिस्त हायस्कूलमध्ये मार्गदर्शन.!

59

सावंतवाडी : सायबर क्राईमचे वाढते प्रमाण लक्षात घेता सोशल मिडिया व इंटरनेटचा वापर सुरक्षितपणे करणे अत्यावश्यक आहे, असे आवाहन सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांनी कलंबिस्त हायस्कूलमध्ये सायबर सुरक्षा मोहिमे अंतर्गत मार्गदर्शन करताना केले. यावेळी त्यांच्या समवेत महिला पोलीस हवालदार माग्देलीन अल्मेडा, पोलीस हवालदार लक्ष्मण काळे, एम्.के.सी.एल.चे प्रतिनिधी रविकिरण परब,  होमगार्ड दिनेश बरागडे, महेंद्रा अकॅडेमीचे महेंद्र पेडणेकर तसेच संस्थेचे सहसचिव श्री. चंद्रकांत राणे , प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेच्या संदर्भात मार्गदर्शन करताना पोलीस उपनिरीक्षक गोते यांनी विविध समाज माध्यमांचा व इंटरनेटचा वापर करताना कोणती खबरदारी घ्यावी याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. इंटरनेट बॅंकिंग व ऑनलाईन व्यवहार याबाबत नेहमीच सावधानता बाळगावी. यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना महत्वाची जीवनसूत्रे सांगत सतत प्रयत्नशील राहा असे आवाहन केले.
या मार्गदर्शन वर्गास उपस्थितांचे स्वागत संस्था सहसचिव चंद्रकांत राणे यांनी केले. प्रास्ताविक महेंद्र पेडणेकर तर आभार प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी मानले.