दोडामार्ग : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा घोटगे नं १ या प्रशालेत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. “सौभाग्याचं लेणं, सुहासिनीचे सौंदर्य हळदी कुंकू समारंभ “कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठया संख्येने महिला सहभागी झाल्या.
शैक्षणिक वर्ष २०२२- २०२३ मध्ये प्रशालेत विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे शाळेतील ज्ञानवंत मुलांनी समृद्धी प्रज्ञाशोध एस.टी. एस, जि.टी.एस परिक्षेत घवघवीत यश मिळवले होते. त्या मुलांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रशालेच्या माजी उपशिक्षिका तथा आता शिक्षण विस्तार अधिकारी सन्मा. दिपा दळवी सोनवल व साटेली भेडशी केंद्राचे केंद्रप्रमुख सन्मा.सूर्यकांत नाईक, कृषि विभाग मध्ये उच्च पदावर काम करून निवृत होऊन सामाजिक कार्य करणारे मोहन दळवी यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी दीपा दळवी यांनी प्रशालेतील एका विद्यार्थीनीला सावित्रीबाई दत्तक पालक योजनेंतर्गत दत्तक म्हणून स्विकारले. शाळेतील माजी विद्यार्थी व प्रशालेतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न झाला. सदर सांस्कृतिक कार्यक्रम नाविन्यपूर्ण व विविधतेने भरलेला असल्याने रसिक प्रेक्षकांनी या सहभागी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. या कार्यक्रम प्रसंगी व्यासपिठावर घोटगे सरपंच भक्ती दळवी, उपसरपंच विजय दळवी, सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष, देवाजकारी, माता पालक संघ, पोलिस पाटील तंटा मुक्ती कमिटीचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, पालक, आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पालकांनी व ग्रामस्थानी सहकार्य केले.
कार्यक्रमप्रसंगी सूत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक दिपक घाडी अहवाल वाचन उपशिक्षक हरिदास राठोड, प्रास्ताविक व आभार प्रशालेचे मुख्याध्यापक गोपाळ पाटील यांनी केले





