सर्वोच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर राहुल नार्वेकर ठाम.! ; आधीचंच वेळापत्रक सादर करणार.

56

मुंबई : आमदार अपात्र दिरंगाई प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तयार केलेल्या वेळापत्रकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. त्यानंतर अध्यक्षांना आज पुन्हा सुनावणीबाबत सविस्तर माहिती देऊन सुधारित वेळापत्रक न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयानं दिलेले. अशातच आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कायदेतज्ज्ञांशी चर्चा करुन यापूर्वी तयार केलेलं वेळापत्रकच सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याचं ठरवलं आहे, अशी माहिती मिळत आहे. अध्यक्ष वेळापत्रकात बदल करण्याची शक्यता धूसर असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. तसेच, न्यायालयानं लेखी आदेश दिल्यास वेळापत्रकात बदल करू, अशी भूमिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतली असल्याची माहिती मिळत आहे.