Home ब्रेकिंग न्यूज संत समाज हळदोणातर्फे ‘तपोभूमी दिनदर्शिका’ वितरण.! ; प. पू. सद्गुरु ब्रम्हेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या...

संत समाज हळदोणातर्फे ‘तपोभूमी दिनदर्शिका’ वितरण.! ; प. पू. सद्गुरु ब्रम्हेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने झाला कार्यक्रम संपन्न.

64

पणजी : रविवार दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रोजी श्री साईबाबा मंदिर साईनगर येथे श्रीदत्त पद्मनाभ पीठ संचालित संत समाज हळदोणातर्फे तपोभूमी दिनदर्शिका 2024 व सुगंधी उटण्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री गजानन भोसले (वाणिज्य कर अधिकारी), श्री. दयानंद नाईक (अध्यक्ष – श्री साईबाबा देवस्थान),  श्री गोविंद गोवेकर (अध्यक्ष – शिवराज्य प्रतिष्ठान), श्री. शिवानंद नाईक ( अध्यक्ष – गोपाळ कृष्ण मंदिर), कमलाकांत करापूरकर (RTO अधिकारी) आदि यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी दयानंद नाईक यांनी सांगितले, प. पू. सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्यस्वामी महाराजांचे कार्य हे अवर्णनीय आहे, तपोभूमीचे कार्य असेच पुढे सुरू राहवे, संपूर्ण गोमंतकातील मंदिरांच्या उत्सवांची माहिती या दिनदर्शिकेत समाविष्ट आहे ही खूप चांगली गोष्ट आहे.  गोविंद गोवेकर म्हणाले, तपोभूमीच्या उपक्रमांची माहिती घराघरात पोचली पाहिजे. व या सर्व उपक्रमांचा सनातनी लोकांनी आपल्या मुलांना या उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, कार्यक्रमाला संत समाज हळदोण्याचे अध्यक्ष सविदास नाईक, गुरुबंधू श्री. प्रकाश , श्री. राघोबा , श्री. भालचंद्र , गंगाराम , पद्मनाभ, सुरेंद्र ,सुभाष, रोहिदास, सौ. सुजया , सौ. संगीता , सौ. शम्मी, सौ. श्वेता , सौ. लक्ष्मी , सौ. नीता, प्रिया, शांती, पूर्णा आदि उपस्थित होते. प्रथम सद्गुरु नामावळी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व हळदोणे परिसरात अभियान संपन्न झाले.