सावंतवाडी : सावंतवाडी येथील पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांना लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांना एक लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी रायगड येथील लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले होते. त्यांना आज जिल्हा न्यायालयात हजर केले असता 16 ऑक्टोबर पर्यंत अर्थात तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सदरचा प्रकरणाचा तपास सिंधुदुर्ग जिल्हा लाच लुचपत विभागाच्या पथकाकडे सोपवण्यात आला आहे.
या प्रकरणात आणखी एक पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील यांचा यात समावेश आहेत. ते काल मंत्र्यांच्या दौऱ्यात होते.
दरम्यान आज सकाळपासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत त्यांची अटक कारवाई लांबणीवर गेली आहे. श्री पाटील हे लाच लुचपत विभागाच्या रडारावर आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांची प्रकृती
खालावली आहे. मात्र लवकरच त्यांना ताब्यात घेऊ असा विश्वास जिल्हा लाच लुचपत विभागाचे उपविभागी अधीक्षक अरुण पवार यांनी दिली. सध्या पोलीस कोठडीत असलेले सागर खंडागळे यांची कसून चौकशी सुरू आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.





