सावंतवाडी : ओरोस येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 14 वर्षांखालील मुलांच्या जिल्हास्तरीय उंच उडी स्पर्धेत कलंबिस्त हायस्कूलच्या मंदार सत्यविजय राऊळ याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. त्याची सांगली येथे होणा-या विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्याला प्रशालेचे क्रीडा शिक्षक प्रकाश पावरा यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष शिवाजी सावंत, सचिव यशवंत राऊळ, चंद्रकांत राणे व सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक अभिजीत जाधव व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.






