बांदा येथील विविध ठिकाणांची झाली स्वच्छता.! ; संविता आश्रम पणदूर, रोटरी क्लब, बांदा ग्रामपंचायत व बांदा पोलीस ठाणे यांचा संयुक्त उपक्रम.

49

बांदा : संविता आश्रम पणदूर, रोटरी क्लब ऑफ बांदा, बांदा ग्रामपंचायत व बांदा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज बांदा बस स्थानक, बांदेश्वर मंदिर, बांदा पोलीस ठाणे आदि परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी संविता आश्रमचे सर्वेसर्वा संदीप परब, रोटरीचे अध्यक्ष प्रमोद कामत, बांदा माजी जिल्हा परिषद सदस्य गुरुनाथ पेडणेकर, सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे, समीर भोसले, पोलीस कर्मचारी तसेच बांद्यातील नागरिक, रोटरीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आदि मंडळी उपस्थित होते. यावेळी सर्वांनीच परिसर स्वच्छतेत सहभाग घेतला.

स्वच्छता कामासाठी संविता आश्रम  पणदूर येथून तब्बल चाळीस महिला व पुरुष बांदा शहरात आले होते. संविता आश्रमचे प्रमुख संदीप परब यांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन बांदा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आत्माराम उर्फ बाळू सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमोद कामत यांचाही सन्मान करण्यात आला.