मी कोण आहे हे उद्धव ठाकरे ठरवतील…!

मुंबई : मी कोण आहे हे उद्धव ठाकरे ठरवतील. ते (प्रकाश आंबेडकर) जसं म्हणतात ना? की मी काही त्यांच्या पक्षाचा नाही. मी देखील वंचित बहुजन आघाडीचा नाही. मी शिवसेनेचा आहे. त्यामुळे मी कोण आहे हे उद्धव ठाकरे ठरवीतल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत कोण आहेत? असं प्रकाश आंबेडकर यांनी विचारलं होतं. त्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. प्रकाश आंबेडकर असतील किंवा बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांना आम्ही मानतो. मला त्यांच्या वक्तव्याबाबत काहीही बोलायचं नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.