सावंतवाडी : येथील मिलाग्रीस हायस्कूलच्या मुलांच्या क्रिकेट संघाने नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये १४ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत अजिंक्य पद पटकावत विभाग स्तरावर क्रिकेट स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. संघातील सर्व खेळाडू व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी अभिनंदन केले. यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.





