सावंतवाडी : हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. या राष्ट्रभाषेचे संवर्धन करण्यासाठी सर्वच स्तरावरून प्रयत्न होणे अपेक्षित आहे. आणि त्याची सुरुवात ही केवळ कला शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपासून करून चालणार नाही तर कला, वाणिज्य, विज्ञान आणि इतर सर्व शाखांच्या माध्यमातून या भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथे सांस्कृतिक कमिटीमार्फत आयोजित हिंदी भाषा दिनाच्या कार्यक्रमात प्रशालेचे मुख्याध्यापक जगदीश धोंड यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक मनोगत हिंदी विभाग प्रमुख डॉ. संजना ओटवणेकर यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, हिंदी भाषेचे महत्त्व, हिंदी भाषेच्या प्रचारासाठी आणि संवर्धनासाठी केंद्र सरकार मार्फत सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी शिक्षक, विद्यार्थी आणि समाजाकडून देखील हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी आणि त्याच्या विकासासाठी एकवटलं पाहिजे.
कॉलेजच्या उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी हिंदी दिनाच्या उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या. तर या कार्यक्रमाच्या औचित्य साधून ज्युनिअर कॉलेजच्या कु. रुचिरा पिळणकर, युवराज, अनुष्का पावसकर, सोहम नाईक, सर्वेश सावंत, तेजल परब,रिया पावस्कर, तन्वी सावंत,पवन गांवकर ,वासिफ मुल्ला, श्रावणी रासम, काव्या फडणीस,प्रशांत सावंत, अक्षय कटारे, कनिष्क सम्राट, सई कासकर, सायली म्हाडगूत,पुष्पराज सावंत, श्लोक मालवणकर, आर्या गावडे या विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचे महत्त्व, हिंदी भाषेत आपल्या भारतीय संस्कृतीतील दिसणारे रुढी , परंपरा, चालीरीती, संस्कार इ.प्रतिबिंब आपल्या भाषणातून, मनोगतातून, कथनातून, काव्यवाचनातून,गीतगायनातून विद्यार्थ्यांनी सादरीकरण करून सहभाग नोंदवत हिंदी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची रंगत वाढवली.
सदर कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर, सांस्कृतिक कमिटी प्रमुख प्रा. माया नाईक, प्रा. संतोष पाथरवट, प्रा.दशरथ राजगोळकर, कवयित्री प्रा. महाश्वेता कुबल. प्रा. वामन ठाकूर, प्रा. जोसेफ डिसिल्वा, प्रा. सविता माळगे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सिकास एक्का, कु.दीक्षा सामंत या विद्यार्थ्यांनी केले तर कु. आभार तन्वी सावंत या विद्यार्थिनीने मानले.





