सावंतवाडी : दिनांक ९ ऑक्टोबर या दिवशी ‘जागतिक टपालदिन’ व १० ऑक्टोबर या दिवशी ‘राष्ट्रीय टपालदिन’ साजरा केला जातो. हे दोन्ही दिवस स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये आज उत्साहात साजरा करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशाळेतील सहाय्यक शिक्षिका सौ. जागृती प्रभू तेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांना या दिनांविषयी माहिती दिली. त्यात डाक घरांच्या व्यवस्थेची भारतातील संख्या, पूर्वीच्या काळात पोस्ट व पत्राचा होणारा जास्त वापर, तसेच मोबाईल, कॉम्प्युटर यामुळे आताच्या काळात पत्र, पोस्ट यांचा वापर कसा कमी होत गेला या विषयी माहिती सांगितली गेली. तर, डाकघरात कोणकोणत्या सुविधा असतात, याबद्दल शाळेतील सहा. शिक्षिका सौ. अश्विनी पडवळ यांनी माहिती सांगितली. डाकघराची माहिती, त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सहज सुलभ पद्धतीने समजावे याकरिता विद्यार्थ्यांना पत्राचे नमुने , स्टॅम्प, पोस्टमन व टपालपेटीचे चित्र, पिनकोड या विषयीची माहिती व जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस जे हिमाचल प्रदेशात आहे त्याचे छायाचित्र तसेच ‘ जूईचे पत्र ‘ नावाचे पुस्तक हे सर्व शाळेत प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात या प्रदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. अशाप्रकारे स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये जागतिक व राष्ट्रीय टपालदिन आज साजरा करण्यात आला.
Home ब्रेकिंग न्यूज स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले टपाल व्यवस्थ्येचे अनुभव विश्व.! ; जागतिक...





