सावंतवाडी : सावंतवाडी पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होता. मात्र आता राज्यात जनतेचे सरकार आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. म्हणूनच सावंतवाडी पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा अनेक वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मार्गी लावला आहे. त्यामुळे तमाम सावंतवाडी तालुकावासीयांच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानतो, असे सांगत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ग्रामविकास मंत्र्यांचे विशेष आभार मानले आहेत.
आज सायंकाळी ऑनलाआईन पद्धतीने झालेल्या पत्रकार परिषदेत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली असून लवकरच या संदर्भात प्रत्यक्ष पत्रकारांशी व जनतेची संवाद साधेल, असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.
Home ब्रेकिंग न्यूज सावंतवाडी पंचायत समितीच्या नूतन इमारतीला प्रशासकीय मान्यता.! ; शिक्षण मंत्री दीपक केसरकर...





