सावंतवाडी : वैश्यवाणी समाजाचा शतकमहोत्सवी गौरव सोहळा रविवार १२ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता सावंतवाडी येथील वैश्य भवन या हॉलमध्ये संपन्न होणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत वैश्य समाज अध्यक्ष रमेश बोंद्रे यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज कमिटीसिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शतक महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. यानिमित्त वधू वर परिचय मेळावा व वार्षिक स्नेहसंमेलन 2023 ते आयोजन करण्यात आलेले आहे.
समाज बांधवांचे प्रबोधन होत असताना उद्योग व्यवसायाच्या नव्या दिशांचे दर्शन व्हावे आणि त्यासोबत परस्पर परिचयातून कुटुंब व्यवस्था सशक्त होऊन समाज संघटना बळकट व्हावी या हेतूने वधू वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे, असेही बोंद्रे म्हणाले. याचा शुभारंभ शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते होणार असून केसरकर यांचा जिल्हा वैश्यवाणी समाज बांधवांच्या वतीने या मेळाव्यात भव्य सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती ही बोंद्रे यांनी दिली.
या शतक महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार राजन तेली तर प्रमुख पाहुणे म्हणून कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश जी पारकर, सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्था मर्यादित फोंडाघाट खातू मसाल्याचे मालक कोकण रत्न व उद्योजक शालिग्राम खातू,अखिल गोमंतक वैश्य परिषद चे अध्यक्ष शुभ्राय दिनानाथ शेठ उर्फ सुभाष मसुरकर, वैश्य समाज बेळगावचे अध्यक्ष दत्ता प्रभाकर कणबर्गि उपस्थित राहणार असल्याची ही माहिती बोंद्रे यांनी दिली. या पत्रकार परिषदेमध्ये वर्ष समाज जिल्हाध्यक्ष सुनील भोगटे, पुष्पलता कोरगावकर, बाळ बोर्डेकर, अँड.दिलीप नार्वेकर, समीर वंजारी, वेंगुला सचिव कपिल पोकळे, जिल्हा सचिव भार्गव राम धुरी, सुनील धुरी, प्रतीक बांदेकर, गितेश पोकळे, देवेंद्र नाईक आधी उपस्थित होते.





