‘भारतीयांनो जिथं आहात तिथंच…’ , इस्राइलमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी अ‍ॅड्वायजरी जाहीर.! ; ‘या’ गोष्टी टाळण्याच्या सूचना.

57

नवी दिल्ली : हमास या दहशतवादी संघटनेने आज इस्राइलवर रॉकेटने हल्ला केला. ज्यात इस्राइलच्या ४० नागरिकांचा मृत्यू झाला तर ७४० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर इस्राइलने हमासविरोधात युद्धाची घोषणा केली आहे. सध्या भारताचे अनेक नागरिक इस्राइलमध्ये अडकल्याची माहिती समोर येत आहे. या अडकलेल्या नागरिकांसाठी भारत सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने इस्रायलमधील आपल्या नागरिकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. भारताे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय आणि इस्रायलमधील सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितलं आहे. नागरिकांनी सुरक्षित वाटणाऱ्या ठिकाणी किंवा घरी राहावं, असं या सूचनांमध्ये म्हटलं आहे. हमासने इस्रायलवर केलेल्या आकस्मिक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे समोर आले आहे.

याआधी या हल्ल्याचा भारताने निषेध नोंदवला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत आपण इस्राइलसोबत एकजुटीने उभे आहोत, असे वक्तव्य देखील केले होते. यावर इस्राइलच्या बड्या अधिकाऱ्याने प्रतिक्रिया देत भारतासारख्या चांगल्या देशाच्या पाठिंब्याची आणि समर्थनाची गरज असल्याचे देखील वक्तव्य केले होते.

हमासने केलेल्या या हल्ल्याचा बाकी देशांकडून देखील निषेध केला आहे. अमेरिकेने या घटनेचा निषेध नोदंवला आणि सांगितलं की दहशतवादाचं स्पष्टीकरण दिलं जाऊ शकत नाही. याआधी देखील इस्राइलवर गाझा पट्टीवरुन रॉकेट हल्ला कऱण्यात आला होता. मात्र, त्यावेळी रॉकेटची संख्या कमी होती. काही वर्षांपूर्वी इस्राइलच्या ‘Iron Dome’ या संरक्षण कवचामुळे काही रॉकेट नष्ट करण्यात इस्राइलला य़श आलं होत. यावेळी इस्राइलकडून सांगण्यात आलय की आम्ही मजबूत आहोत आणि घटनेचा वचपा नक्की काढू.