लई भारी..!, नव्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे स्लीपर कोच पाहून व्हाल थक्क.! ; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केले फोटो.

146

नवी दिल्ली : वंदे भारत ट्रेन हा भारतीयांसाठी आरामदायी रेल्वे प्रवासाचा एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. पण आता लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नवी स्लीपर कोच वंदे भारत ट्रेन तयार होत आहे. या जबरदस्त फीचर आणि सस्पेन्शन असलेल्या कोचची संभाव्य छायाचित्रे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केले आहेत.

चेन्नईच्या फॅक्टरीत तयार कोचेस –

या नव्या स्लीपर कोचचे प्रोटोटाईप चेन्नईच्या इंटेग्रल कोच फॅक्टरीमध्ये पुढच्या वर्षी फेब्रुवारीपासून तयार होणार आहेत. या कोचचे काही संभाव्य फोटो वैष्णव यांनी मंगळवारी ट्विटरवरुन शेअर केले आहेत.

यामध्ये AC2 टायर कोचच्या अंतर्गत भागाचं दृश्य दाखवणारे हे फोटो आहेत. ही अंतर्गत रचना फायनल झाली असून प्रवाशांच्या कम्फर्टचा विचार करुन ते बनवण्यात आले आहेत. यामध्ये रुंद आणि आरामदायी बर्थ दिसताहेत. तसेच वरच्या बर्थवर जाण्यासाठी पायऱ्यांची सोयही करण्यात आली आहे.

इतके असतील बर्थ –

या नव्या वंदे भारत ट्रेनला १६ कोचेस असणार आहेत, यामध्ये केवळ AC1 हा या नव्या प्रकारचा स्लीपर कोच असणार आहे. या ट्रेनमध्ये एकूण ८५७ बर्थ असतील यांपैकी ८२३ बर्थ हे केवळ प्रवाशांसाठी असतील तर उर्वरित ३४ बर्थ हे स्टाफसाठी असणार आहेत.