देवगड : देवगड ग्रामीण रुग्णालयातील रिक्त असलेल्या पदासंदर्भात व ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना मिळणाऱ्या असमाधानकारक वागणुकीबाबत देवगड उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांच्या नेतुत्वाखाली देवगड ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. सौ. स्मृती केळकर यांना निवेदन देण्यात आले.
देवगड ग्रामीण रुग्णालयात सद्यस्थितीत वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेविका व अन्य पदे रिक्त असल्याने ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत प्रसंगी या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव असताना देखील त्यावर उपचार केले जात नाही सांगितले जाते अशी माहिती मिळाली आहे सद्यस्थितीत देवगड आजूबाजूच्या परिसरात कापसाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून सर्वसामान्य रुग्णांना ग्रामीण रुग्णालय उपचार घ्यावे लागतात असे असताना रुग्णालयात आल्यानंतर कोणत्याही प्रकारचे उपचार केले जात नाही बाब खेदजनक आहे. बाबत आपल्या ग्रामीण रुग्णालयात सद्यस्थितीत ११ पदे रिक्त आहेत.
त्याचबरोबर या ठिकाणी आवश्यक ते उपचार तात्काळ सुरू करण्यात यावे अशा असर असहकार्याची वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत रिक्त पदाबाबत आवश्यक ती कार्यवाही न झाल्यास व रुग्णांना सहकार्याची वागणूक देण्यात हयगय झाल्यास शिवसेना उबाठा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा निवेदनाद्वारे उबाठा सेनेच्या वतीने देवगड ग्रामीण रुग्णालयात डॉ केळकर यांचेकडे देण्यात आले. यावेळी उबाठा सेनेचे युवा तालुकाप्रमुख गणेश गावकर,माजी नगरसेवक विकास कोयंडे, हर्षा ठाकूर, उदय करंगुटकर,गणपत जाधव, उदय भुजबळ ,बाळा कणेरकर, बाळू कावले, योगेश गोळम आदी उपस्थित होते.








