सावंतवाडी : आज 2 आॕक्टोबर 2023 रोजी सावंतवाडी आर.पी.डी. हायस्कूल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पांजली व आदरांजली वाहण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर , राष्ट्रीय काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विकासभाई सावंत, काँग्रेस नेते ॲड. दिलीप नार्वेकर, शहर अध्यक्ष ॲड. राघवेंद्र नार्वेकर, महिला प्रांतिक सदस्य विभावरी सुकी, ओबीसी सेल प्रांतिक सदस्य अमिदी मेस्त्री, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, सेवादल तालुकाध्यक्ष संजय लाड, संदीप सुकी, भाऊसाहेब देसाई, बबन डिसोजा, मिनीन गोम्स, अरुण नाईक, कौस्तुभ पेडणेकर, प्रदीप चौगुले, संजय राऊळ, माया चिटणीस आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.








