अशोक धुरी यांनी जपली सामाजिक बांधिलकी .! ; माजगाव येथे क्षय रुग्णासाठी पोषण आहार.

19

सावंतवाडी :  माजगाव येथे महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून गावातील क्षय रुग्णाना सहा महिन्यासाठी दत्तक घेऊन पोषण आहार देण्याचा मान माजगाव ग्रामपंचायत सदस्य अशोक धुरी संकल्प मित्र यांच्याकडून करण्यात आला. यावेळी आरोग्य सामुदायिक अधिकारी डॉ. सौ. सुप्रिया धाकोरकर यानी उपस्थितांना आयुष्यमान भव व अवयोदन कार्यक्रमा संदर्भात माहिती व मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितानी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली.
यावेळी माजगाव ग्रामपंचायत सरपंच सौ. अर्चना सावंत, सदस्य अशोक धुरी, माधवी भोगण, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सौ. सुजाता धुरी आदी तसेच गावातील मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आरोग्य सेवक साईनाथ वेटे यांनी केले.