महाराष्ट्र माझाचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी स्वप्निल लोके मडगाव गोवा येथे आदर्श पत्रकार पुरस्काराने सम्मानित.!

462
  • सिंधुदुर्ग :हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था कराड या संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पाचव्या राष्ट्रीय गोमंतक गोवा पुरस्कार 2023 साठी पत्रकारिता या क्षेत्रामध्ये आपण केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आलेख पाहता आमच्या संस्थेच्या वतीने आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी महाराष्ट्र माझा न्युज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी स्वप्निल यशवंत लोके यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण मडगाव समर्थगड गोवा येथे देशाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व संस्थेचे अध्यक्ष डॉ सुनील फडतरे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण रविवार १ ऑक्टोबर २०२३ श्री स्वामी समर्थ सभागृह मडगाव येथे करण्यात आले.

यावेळी आमदार उल्हास तूयेकर, उदय बने ,अँड आशा देसाई,महेश थोरवे, शाहू महाराज, श्री स्वामी समर्थ मडगाव मठाचे जयेष नाईक आदी उपस्थित होते.
पत्रकार स्वप्नील लोके २००१ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. २००१ पासून मिठबाव ग्रामीण भागातून पत्रकार म्हणून आपल्या कामास सुरुवात केली. प्रिंट मीडिया ते इलेक्ट्रॉनिक मिडीया असा त्यांचा आजपर्यंतचा पत्रकारितेचा प्रवास सुरू आहे.त्यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सम्मानित केल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.