सावंतवाडी : ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत स्वच्छता फेरी व स्वच्छता दौड शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत काढण्यात आली. स्वच्छता फेरी करत असताना मुलांनी स्वच्छतेवर आधारित घोषणा दिल्या. तसेच गावातील शाळा,प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामपंचायत बहुउद्देशीय व्यापारी संकुल, सार्वजनिक मंदिर, मळेवाड विविध कार्यकारी सहकारी सोसायटी कार्यालय, ग्रामपंचायत बाजारपेठेची जागा, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा विहिरी, सार्वजनिक स्वच्छतागृह, मळेवाड रास्त धान्य दुकान, अंगणवाडी तसेच सार्वजनिक ठिकाणी साफसफाई करण्यात आली. ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानात आजचा एक दिवस स्वच्छतेसाठी राबविण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य,कर्मचारी, अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व पदाधिकारी, अधिकारी, तलाठी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा, सीआरपी, रास्त धान्य दुकानदार, सोसायटी पदाधिकारी, संचालक, शालेय व्यवस्थापन पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








