सावंतवाडी पोलीस ठाणे अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाची अंमलबजावणी.!

48

सावंतवाडी : आज रोजी सावंतवाडी पोलीस ठाणे, पोलीस लाईन येथे एसपीके महाविद्यालयाच्या एनसीसी आर्मी आणि नेव्ही विंगचे विद्यार्थी, तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री. सचिन सर आर्मी विंग आणि श्री अरबाज सर नेव्ही विंग, पोलीस ठाणे हद्दीतील ज्येष्ठ नागरिक, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. इंगवले, श्री. खंडागळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अमित गोते, आनंद यशवंते, सरदार पाटील, सूरज पाटील, गजानन भालेराव यांसोबत पोलीस हवालदार राऊत, श्री. वालावलकर, श्री. जाधव, सहाय्यक फौजदार देसाई, महिला पोलीस अंमलदार धनुजा ठाकूर, पूजा जाधव, शर्मिला गवस, महिला पोलिस नाईक चैताली देसाई, शिल्पा केदार, महिला पोलीस हवालदार सावंत, दुधवडकर, साक्षी कोपकर, तसेच होम गार्ड श्री. भांड्ये, श्री. वेंगुर्लेकर आदींनी एकत्र येत सहकार्य केले.

शासनाच्या ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत सकाळी 10.00 ते 12.00 वाजेपर्यंत पोलीस ठाणे पोलीस, लाईन परिसर प्लास्टिक मुक्त केला.

पोलीस ठाणेकडे येणाऱ्या रस्त्याच्या वरील खड्डे बुजवले. परिसरातील अनावश्यक ठिकाणी गवत, कचऱ्याची विल्हेवाट लावली आणि स्वच्छता मोहीम राबवली.
एनसीसी विद्यार्थ्यांना पोलीस ठाणे सावंतवाडी येथील हॉलमध्ये एकात्मतेचे, स्वच्छतेचे व शिस्तीचे महत्व सांगून करिअरदृष्ट्या मार्गदर्शन केले. आलेले ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व पोलीस अधिकारी अंमलदार यांना चहा, नाश्ता देण्यात आला. एनसीसी विद्यार्थ्यांचे ‘हम सब भारतीय है’ या एकात्मतेच्या गाण्याने स्वच्छता उपक्रम कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
पोलीस ठाणेचे अधिकारी श्री. अमित गोते यांनी ज्येष्ठ नागरिक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले आणि शुभेच्छा दिल्या.

सर्व कार्यक्रम ऋषिकेश अधिकारी
पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आला