सावंतवाडी : भाजपचे महाराष्ट्राचे युवा नेते तथा युवा उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते विशाल सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांचा वाढदिवस १५ ऑक्टोबर २०२३ रोजी मोठ्या उत्साहात आणि दिमाखात तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा होत आहे.
यानिमित्ताने विविध उपक्रमाने आयोजित अशा ‘विशाल अभिष्टचिंतन सोहळ्या’चे आयोजन करण्यात येत आहे.
परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘विशाल सेवा सप्ताह’ साजरा करण्यात येणार असून ९ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर याकालावधीत तब्बल एक आठवडा संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
हे कार्यक्रम कोणते असणार आहेत, त्या संदर्भात २७ सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता सावंतवाडी शिल्पग्राम येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या पत्रकार परिषदेस वर्तमानपत्र,
चॅनेल्स, वृत्तवाहिनी, सोशल मिडीया प्रमुखांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले आहे.
वाढदिवस कसा असेल?, आठवडाभर कोणकोणते कार्यक्रम होणार आहेत?, याची घोषणा या पत्रकार परिषदेत संजू परब करणार आहेत. या पत्रकार परिषदेत विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त जे जे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यक्रम होणार आहेत, याची घोषणा संजू परब करणार आहेत. तरी या पत्रकार परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन विशाल परब मित्रमंडळ आणि भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने संजू परब यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला संजू परब यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.









