‘किसमें कितना है दम’ ; किंग खानच्या ‘डंकी’सोबत टक्कर घेणार प्रभास.!

32

मुंबई : सध्या मनोरंजन विश्वात शाहरुख खानच्या जवानची चर्चा आहे. या चित्रपटाने रिलिज होताच अनेक नवनवीन विक्रम केले आहेत. अजूनही या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये आहे. यापूर्वी शाहरुख खानने चार वर्षानंतर ‘पठाण’ चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर एंट्री केली आणि धुमाकूळ घातला होता. शाहरुखच्या पठाण आणि जवान या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींचा टप्पा पार केला.

यासोबतच शाहरुख एका वर्षात सर्वात जास्त चित्रपटाची कमाई करणारा अभिनेता बनला. आता ‘जवान’नंतर शाहरुख खान ‘डंकी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुखचे चाहते त्याच्या या चित्रपटासाठी खुपच उत्सूक आहेत. शाहरुखचा हा चित्रपट येत्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. आता त्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, साऊथ सुपरस्टार प्रभासचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘सालार’ देखील ख्रिसमसच्या दिवशी रिलीज होण्याच्या तयारी आहे. इतकच नाही तर तो शाहरुख खानच्या ‘डिंकी’ला टक्कर देणार अशीही माहिती समोर आली आहे.

रतीय चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबद्दल माहीती दिली आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याबद्दल सांगितले आहे. तरणने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘हो, हे खरं आहे. या ख्रिसमसमध्ये शाहरुख vs प्रभास, ‘ डंकी’ vs ‘सालार’ असा सामना रंगणार आहे. सालार ख्रिसमसला 22 डिसेंबर 2023 रोजी चित्रपटगृहात रिलिज होणार आहे. याची अधिकृत घोषणा 29 सप्टेंबर 2023 रोजी होईल.

पुढे तरण आदर्श लिहितो की, ही दुसरी वेळ आहे जेव्हा HombaleFilms ची शाहरुखसोबत सोबत टक्कर होणार आहे. 2018 च्या सुरुवातीला शाहरुख खानचा झिरो चित्रपटाची यशच्या KGF चित्रपटासोबत टक्कर होणार आहे. मात्र यात शाहरुखचा ‘झिरो’ बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप गेला तर ‘केजीएफ’ने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले.