मनसे पदाधिकाऱ्यांच्या घरी गणरायांचे दर्शन घेत माजी आमदार परशुराम उपरकरांनी कार्यकर्त्यांना दिले बळ.

32

सावंतवाडी : मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी सोमवारी सावंतवाडी दौऱ्यावर येत बांदा विभागातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या घरी भेटी देत गणरायांचे दर्शन घेतले.
बांदा माजी शहराध्यक्ष बाळा बहिरे यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेत पदाधिकाऱ्यांसह स्नेहभोजनाचा आस्वादही त्यांनी घेतला. यावेळी बांदा पंचक्रोशीतील पदाधिकारी माजी विभाग अध्यक्ष नाना सावंत, ग्रामपंचायत सदस्य आदेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर, निलेश परब यांसह पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले.

यावेळी कुडाळ माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, सचिव राजेश टंगसाळी, मंदार सुभेदार, रस्ते आस्थापना जिल्हा संघटक अमोल जंगले, सावंतवाडी विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष संदेश सावंत, उपतालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर नाईक, गोविंद सोनी यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

बांदा व आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गणरायाचे दर्शन घेत उपरकर यांनी मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.