मुंबई : कोविड काळातील खिचडी घोटाळ्यात आदित्य ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण आणि अमोल किर्तीकर यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कसून चौकशी केली. लॉकडाउनच्या काळात गरीब व मजूरांना मोफत जेवण वाटपाचा निर्णय उध्दव ठाकरे सरकारने घेतला होता.
यावेळी BMC कडून 4 कोटी खिचडी पाकीट वाटपाचा निर्णय झाला. यातच हा घोटाळा करण्यात आला आहे. अमोल किर्तीकर यांच्या खात्यात 52 लाख तर सूरज चव्हाण यांच्या बँक खात्यात 37 लाख रुपये कंत्राटदारांकडून जमा झाल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली. त्यामुळे या दोघांना कधीही अटक होण्याची शक्यता वर्तवली जातेय.








