परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या २०५ बसेस आरक्षित..!

29

कुडाळ : गौरी-गणपतीच्या सणासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाकरिता एसटीचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज झाला आहे. आतापर्यंत परतीसाठी २०५ गाड्यांचे बुकिंग झाले आहे. तर यावर्षी सुमारे ४०० बसेसच्या माध्यमातून चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. आपल्या मूळ गावी दाखल झालेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी सिंधुदुर्गचे एसटी विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. चाकरमान्यांना घेऊन ४०० गाड्या दाखल झाल्या आहेत.