सावंतवाडी : येथील भाईसाहेब आयर्वेद महाविद्यालयाला लवकरच भेट म्हणून देणार असून नोव्हेंबर महिन्यात आपण स्वत: सावंतवाडीला येऊन महाविद्यालयास भेट देणार तसेच जानकीबाई सुतिकालयास ॲम्बुलन्स भेट देणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाविद्यालयाचे संचालक तथा माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांना दिले आहे.
नुकतीच मुंबई येथे जाऊन महाविद्यालयाचे संचालक तथा माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुंबई येथील प्रसिद्ध डॉक्टर डॉ. सूर्यकांत राऊळ देखील उपस्थित होते.






