बालकांच्या भावनिक, भाषा विकासासाठी घरात ज्येष्ठांची नितांत गरज.! – भरत गावडे ; निरवडे नं. १ शाळेत ‘आजी-आजोबा दिन’ उत्साहात साजरा.

129

सावंतवाडी : शालेय मुलांचा भावनिक विकास व भाषा विकासाची प्रक्रीया पूर्णत्वाला जाण्यासाठी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे संवाद म्हणजेच आजी -आजोबांची भूमिका महत्वाची असते, याच करीता आजी-आजोबांना सन्मान समान देणे योग्यच आहे. नात्यांची घट्ट विण होण्यासाठी ‘आजी-आजोबा दिन’ साजरा करणे काळाची गरज आहे. असे भावपूर्ण उद्भार- मराठी भाषेचे अभ्यासक भरत गावडे यांनी जि.प. शाळा निरवडे नं. १ या शाळेत काढले.

निरवडे नं. १ याशाळेत आज आजी- आजोबा या जागतिक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यासपीठावर शालेय शालेय व्यवस्थापन समितिचे अध्यक्ष नारायण गावडे, उपसरपंच चंद्रकांत गावडे, संजय गावडे, प्रसाद सांगेलकर, गायत्री गावडे, चैत्राली गावडे व मुख्याव्यापिका सौ. स्मिता पाटकर आदि उपस्थित होते.

प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलित करण्यात आला. मुख्याध्याविका स्मिता पाटकर यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी भरत गावडे पुढे म्हणाले, आजच्या युगात संस्काराचे महत्त्व फार आहे. आपल्या पूर्वीच्या परंपरा, रुढी, चांगले संस्कार एका पिढीकडून दुस-या पिढीकडे संक्रमित करण्यासाठी घरात आजी आजोबा यांचे स्थान अबाधित राखणे काळाची गरज आहे.
यावेळी प्रसाद सांगेलकर यांनीही मार्गदर्शन केले.

या दिनाचे औचित्य साधून – आजी- आजोबांचे औक्षण करून भेटवस्तू देण्यात आली. तसेच मनोरंजाचे खेळ म्हणून संगीत खुर्ची घेण्यात आली. त्यात वय वर्ष ७० ची श्रीमती. रंजना रमांकांत पेडणेकर या आजी विजयी झाल्या.
सिंधुदुर्ग मराठी अध्यापक संघाच्या वतीने एका आदर्श आजोबांचा शाल, श्रीफळ व ग्रंथ भेट देऊन भरत गावडे यांनी सन्मान केला.

या कार्यक्रमासा आजी-आजोबा मोठ्या संखेने उपस्थित होते.
संजय गावडे यांनी मुलांना शैक्षणिक साहित्य दिले, संगिता पास्ते यांनी सूत्रसंचालन केले तर प्रज्ञा राऊळ हिने आभार मानले.