असं ‘विराट’ रेकॉर्ड फक्त कोहलीच करू शकतो..!

42

कोलंबो : भारताची रन मशिन पुन्हा एकदा पाकिस्तानविरूद्ध धडाडली आहे. आशिया कपच्या सुपर 4 मधील पाकिस्तानविरूद्धच्या सामान्यात विराट कोहलीने केएल राहुलच्या साथीने दमदार फलंदाजी करत भारताला 46 व्या षटकात 300 च्या पार पोहचवले. या दरम्यान विराट कोहलीने एक मोठं रेकॉर्ड आपल्या नावावर केलं. विराट कोहली वनडे मध्ये सर्वात कमी वेळात 13000 धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड मागे टाकले.