कुडाळ : कुंभवडे येथे ग्रामपंचायत कुंभवडे व संकल्प प्रतिष्ठान आयोजित महिला बचतगट सदस्यांसाठी फिनेल तयार करण्याचे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मानवी गरजा अन्न, वस्त्र, निवारा व त्याच बरोबरच शिक्षण व आरोग्य होय. आरोग्य सांभाळण्यासाठी स्वच्छता खूप महत्वाची व या स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून फिनेलचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. ही गरज ओळखून ग्रामपंचायत कुंभवडे व संकल्प प्रतिष्ठानने हे प्रशिक्षण आयोजित केले होते.





