मळेवाड येथे अपघात ; दुचाकीस्वार गंभीर जखमी.

798

सावंतवाडी : तालुक्यातील मळेवाड जकातनाका येथील धोकादायक वळणावर एसटी बस व दुचाकी यांच्यात अपघात झाला असून या अपघातात दुचाकीस्वार गजानन शिरसाठ (रा. मळेवाड, शिरसाठवाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक उपचारासाठी शिरसाठ यांना मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.