अन्यथा…उद्यापासून बेमुदत उपोषण.! ; राज्य सरकारला एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा..!

71

मुंबई : राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढवून 38 टक्के केला आहे. यानंतर एसटी कामगाराच्या एका संघटनेच्या वतीने उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. महागाई भत्त्यात अजून चार टक्के वाढ करावी, एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 11 सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.