कोलंबो : श्रीलंकेत खेळला झात असलेला आशिया कप पावसामुळे चर्चेत आहेत. पावसामुळे आशिया कप मधील भारत-पाकिस्तान सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात होती, यादरम्यान या सामन्याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कोलंबो येथील पावसामुळे एशियन क्रिकेट काउंसीलने मोठा निर्णय घेतला असून १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या सामन्यासाठी एक राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेनेजर 10 तारखेला होणारा हा सामना पूर्ण झाला नाही तर हा सामना 11 सप्टेंबरला पूर्ण केला जाऊल. या परिस्थितीत भारतीय संघाला दोन सामने लागोपाठ खेळावे लागणार आहेत. ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे भारताचे 12 सप्टेंबरला बांग्लादेशविरोधात सामना आहे.
सुपर चार मध्ये फाक्त भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यासाठीच रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त इतर कोणताही सामना पावसात वाहून गेला तर तो रद्द करण्यात येईल. भारत-पाक सामन्याव्यतिरिक्त फक्त आशिया कपच्या फायनल सामन्यासाठी रिझर्व्ह डे असणार आहे. म्हटले आहे की, 10 सप्टेंबर 2023 रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सुपर 11 आशिया चषक 2023 सुपर-4 सामन्यासाठी एक राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर प्रतिकूल हवामानामुळे खेळ थांबवण्यात आला तर भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना, 11 सप्टेंबर 2023 रोजी तो स्थगित केल्यापासून सुरू राहील. अशा परिस्थितीत, सामन्याची तिकीटे विकत घेतलेल्यांना ही तिकिटे सांभाळून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सामन्याची ही तिकटे दुसऱ्या दिवशी देखील वैध राहतील, असेही सांगण्यात आले आहे.
आशिया कप 2023 मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदा समोरासमोर आले तेव्हा या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. पल्लेकेली येथे झालेल्या या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करत 266 धावा केल्या होत्या. यानंतर पाऊस आल्याने पाकिस्तानला एकही ओव्हर बॅटिंग करण्याची संधी मिळाली नव्हती.
10 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा लढत होणार आहे. या सामन्यावर देखील पावसाचे संकट घोंगावत आहे. मॅचदरम्यान कोलंबो येथे जोरदार पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे. त्यामुशे एसीसीने रिझर्व्ह डे ठेवण्याचा निर्णय़ घेतला आहे. सामन्यात पाऊस येण्याची शक्यता 90 टक्के सांगितली जात आहे.




