BIG BREAKING – राष्ट्रवादीतील संघर्ष ‘EC’ मध्ये सुरू! ; अजित पवार गटाच्या आमदारांविरोधात शरद पवार गटाचा मोठा निर्णय.

81

मुंबई : शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आले आहे. अजित पवार गटाने केलेले सर्व दावे शरद पवार गटाने फेटाळले आहेत. मंत्र्यासोबत अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांविरोधातही शरद पवार गटाने अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. ९ मंत्र्यासोबत ३१ आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. यातील विधानपरिषदेचे आमदार असल्याची माहिती आहे. आता शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसची लढाई आता निवडणूक आयोगासमोर सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आतापर्यंत एकूण आमदारांपैकी किती आमदार अजित पवार यांच्याकडे आणि किती शरद पवार यांच्याकडे हा आकडा स्पष्ट झालेला नव्हता तो आता समोर आला आहे.

आतापर्यंत दोन्ही गटाकडून आकडेवारी जाहिर करण्यात आलेली नव्हती. मात्र निवडणूक आयोगासमोर याचिका दाखल करताना शरद पवार गटाने ९ मंत्र्यांशिवाय ३१ आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.